मूर्तिजापूर (सुमित सोनोने):- येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय कोरोनाग्रस्त रुगणांसाठी सुसज्ज केले आहे त्यातही येथील खासगी रुग्णालयात अधिग्रहित केले आहे. अकोला रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक झाल्याचे कारण दाखवून तेथील रुग्ण मूर्तिजापूर रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचा घाट प्रशासनाने घेतला आहे. हे कोरोना बाधित रुग्ण येथे आणू नये यासाठी रुग्णालय अधीक्षकांना सर्व पक्षीय निवेदन १ जुलै रोजी देण्यात आले.
जिल्हा स्तरावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना बाधीत रुग्ण, मुर्तिजापुरातील उपजिल्हा रुग्णालय व इतर हॉस्पीटल मध्ये ठेवण्याचा जो निर्णय जिल्हा प्रशासन स्तरावर घेण्यात आला आहे, तो निर्णय तात्काळ रद्द करुन तालुका अंतर्गत रुग्णांसाठी हि व्यवस्था ठेवण्यात यावी, तालुक्यातील लोकसंख्या पाहता उपजिल्हा रुग्णालयामध्ये ४० बेड व ३ आय.सी.यु. बेडची व्यवस्था आहे. ही तालुक्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अतीशय तोकडी आरोग्य व्यवस्था आहे. तसेच इतर तालुक्यातुन व जिल्हा स्तरावरुन येणाऱ्या रुग्नांणापासुन मूर्तिजापुर शहरामध्ये येणाऱ्या रुग्णांपासून फैलाव होण्याची दाट शक्यता आहे यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मूर्तिजापुर शहरामध्ये कोरोना कोविड–१९ रुग्णांची संख्या नसल्यामुळे येणाऱ्या दिवसात अशा काही निर्णयामुळे रुग्ण वाढु शकतात. तरी तालुकाअंतर्गत येत असलेल्या कोरोना रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर येथे उपचाराकरीता घेण्यात यावे, बाहेर तालुक्यातील व अकोला जिल्हयातील कोरोना रुग्णांची पर्यायी व्यवस्था ही जिल्हा स्तरावरच करण्यात यावी असे निवेदन तालुक्यातील सर्व पक्षीय शिष्टमंडळाने येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे यांना देण्यात आले. जर येथे बाहेरील रुग्ण दाखल करुन घेतले तर प्रशासना विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदन कर्त्यांनी दिला.
—————————————-
सद्यस्थितीत तालुक्यात एकच पाॅझिटिव्ह रुग्ण असुन तालुका करोना मुक्त होण्याच्या मार्गावर आहे, यात जिल्हा प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण भरती करण्या बाबतीत घेतलेला निर्णय चुकीचा आहे यावर गांभीर्याने विचार करावा, जिल्ह्यातील एकही कोरोना रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात भरती केल्यास आम्ही तिव्र आंदोलन करु.
राम मोहनलाल जोशी
शहर उपाध्यक्ष भाजपा. मूर्तिजापूर