कोरोना अलर्ट
आज शुक्रवार दि.३ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-७३
पॉझिटीव्ह अहवाल-सात
निगेटीव्ह-६६
अतिरिक्त माहिती
आज सकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. ते पातूर, मोठी उमरी, पारस, इकबाल नगर बुलडाणा, वाकेकर हॉस्पिटल जळगाव जामोद जि. बुलडाणा(हा रुग्ण ओझोन हॉस्पिटल येथून संदर्भित आहे), बार्शी टाकळी, बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाला. मयत रुग्ण हा ६५ वर्षीय पुरुष असून शंकरनगर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.२३ जून रोजी दाखल झाला होता. त्याचा आज पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १६१४
मयत-८४ (८३+१), डिस्चार्ज-१२००
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३०
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!