अकोला,दि.२८- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हॉटेल रेजन्सी या इमारतीला कोविड केअर सेंटर म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मान्यता दिली आहे. या इमारतीत रुग्णांना सशुल्क राहता येणार असून त्यासाठी सहयोग गृप आशा मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत वैद्यकीय उपचार व देखभाल व्यवस्था ठेवली जाणार आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात सहयोग गृपच्या डॉ. प्रशांत वानखडे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी अहवाल सादर केल्यानंतर ही मान्यता देण्यात आली आहे. याठिकाणी आयसीएमआर यांनी दिलेल्या निर्देश व सुचनांप्रमाणे रुग्णांची देखभाल व उपचार करणे बंधनकारक असून त्याचा दैनंदिन अहवालही जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.