अकोला (प्रतिनिधी)- दिपक निकाळजे सामाजिक विकास संघटना अकोला जिल्हाच्या वतीने कुस्ती पहेलवान आकाश इंगळे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत लाॅकडाऊन परिस्थितीत गोरगरिब नागरिकांना पुरेसे अन्नधान्य वाटप करत आलेले आहे.त्याच अनुषंगाने अकोला शहरातील सुर्योदय आश्रम, गायत्री बालिकाश्रम व वोरा अंध विद्यालय येथे आज युवा नेते अक्षय निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य वाटप करुन समाजात आदर्श निर्माण केला आहे. दिपक निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा कुस्ती पहेलवान आकाश संजय इंगळे कोरोनावर मात करून आल्यानंतर सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत हे येथे उल्लेखनीय बाब आहे.युवा नेते अक्षय निकाळजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेले अन्नधान्य वाटपाप्रसंगी पहेलवान आकाश इंगळे,पहेलवान गृपचे निखिल वाकोडे,आशिष मांगुळकर,विक्की खाडे,मनिष अरखराव,आनंद सोनोने, बाळासाहेब वानखडे,नागेश बारिंगे,निलेश अंभोरे यांच्या सह दिपक निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवक उपस्थित होते.