पातूर (सुनिल गाडगे): तालुक्यातील विवरा या गावामध्ये वन्यप्राण्यांचा पिकांमध्ये हैदोस सुरू झाला आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून शेतकरी त्रस्त झाला आहे
13 जून रोजी या भागातील बालाजी देशमुख यांच्या शेतातील दीड एकरातील सोयाबीन पीक रोही(नीलगाय),हरणांनी उध्वस्त केले आहे यामध्ये दोन लाखाचे नुकसान या भागात झाले आहे
सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला आधीच कंटाळला आहे त्यात उगवलं पीक उध्वस्त होत असल्याने हवालदिल झाला आहे. या भागातील ईतर शेतकरी यांची सुद्धा स्तिथी हिच आहे
त्रस्त शेतकरी बालाजी देशमुख यांनी पातूर वनविभाग तसेच तहसीलदार यांना निवेदन दिले असून तात्काळ सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे