कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या डोक्यावरील छताची चिंता करू नये,” अशी घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. कोविड -१९ मुळे मृत्यू पावलेल्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल.
गृहमंत्री म्हणाले, की सरकारने माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे. “पोलिस कर्मचार्यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या बदल्यात आपण कमीतकमी हे करू शकू.” कोविड -१९ च्या अनुषंगाने कर्तव्यावर असताना ४२८८ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३२३९ जण पूर्णतः बरे झाले आहे ही आनंददायक बाब आहे. परंतु, ५१ जणांचा बळी देखील गेला आहे ही खेदाची बाब आहे.