अकोला,दि.२५- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे २९८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २६५ अहवाल निगेटीव्ह तर ३३ अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान आज दिवसभरात तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर आज दिवसभरात ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १३४२ झाली आहे. आजअखेर २७८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ९६०० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ९२४५, फेरतपासणीचे १४० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २१५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९४८० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८१३८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १३४२ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३३ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १२ महिला व १९ पुरुष रुग्ण आहेत. त्यातील आठ जण हरिहरपेठ येथील, सहा जण डाबकी रोड येथील, आदर्श कॉलनी येथील तीन, सिंधी कॅम्प येथील दोघे तर उर्वरीत बाळापूर, अण्णाभाऊ साठे नगर, श्रीवास्तव चौक, भीमनगर, गंगानगर, पातूर, काळवाडी, अकोट फैल, तारफैल, देशमुख फैल, लक्ष्मीनगर, केंद्र खुर्द जि. हिंगोली येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एक पुरुष व एक महिला असून ते अकोट फैल व खदान येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
तिघांचा मृत्यू
दरम्यान आज दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला. त्यात केंद्र खुर्द जि.हिंगोली येथील २१ वर्षीय महिलेचा समावेश असून ही महिला दि.२२ रोजी दाखल झाली होती. तिचा काल (दि.२४) रात्री मृत्यू झाला. तिचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. तसेच अन्य एक ५० वर्षीय पुरुष रुग्ण खामखेड ता. बाळापुर येथिल रहिवासी आहे. हा रुग्ण दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्याचा काल रात्री मृत्यू झाला. दरम्यान आज दुपारनंतर बैदपूरा येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला दि.२ जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
८५ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२ जणांना व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात स्थापण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथून ७३ जणांना, असे आज एकूण ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या १२ जणांत तीन महिला व नऊ पुरुष आहेत. त्यात तारफैल येथील तीन जण तर बलोदे ले आऊट, बार्शी टाकळी, मोठी उमरी, अकोट फैल, रेल्वेपुलाजवळ, न्यू तापडीया नगर, बाळापुर, गुलजारपुरा आणि महाकालीनगर येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या ७३ रुग्णात अकोट फैल येथील २१, कैलास टेकडी आठ, सिटी कोतवाली येथील सात, देशमुख फैल येथील सहा, तारफैल व खदान प्रत्येकी पाच, टॉवर चौक चार, उमरी आणि सिंधी कॅम्प प्रत्येकी दोन तर आदर्श कॉलनी, डाबकी रोड, शिवसेना वसाहत, शरीफ नगर, तापडीया नगर, देवी खदान, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, समता नगर, गुलजार पुरा, इराणी वस्ती, न्यू तार फैल व अकोट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोवीड केअर सेंटर येथून देण्यात आली.
२७८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १३४२ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७४ जण (एक आत्महत्या व ७३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ९९० आहे. तर सद्यस्थितीत २७८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.