• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, September 23, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यात २३.६० लाखांपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे तर ४७.९३ लाख क्विंटल धान्य वाटप

Team by Team
June 25, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
81 1
0
Shiv Bhojan Thali
24
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यातील ५२ हजार ४४० स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे १ जून ते २३ जून पर्यंत राज्यातील १ कोटी २४ लाख ६६ हजार १२२ शिधापत्रिका धारकांना ४७ लाख ९३ हजार ६९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच २३ लाख ६० हजार ६८४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात १ जून ते २३ जून पर्यंत ८५१ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २३लाख ६० हजार ६८४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत ८१ लाख ४४ हजार ४६१शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत. दरम्यान, राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना५२ हजार ४४० स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १७ लाख चार हजार २१३ क्विंटल गहू, १३ लाख तीन हजार ८३४ क्विंटल तांदूळ, तर ८७हजार सहा क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ३ लाख ७ हजार १८० शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. १ जूनपासून एकूण ६२ लाख ८९ हजार ४६४ रेशनकार्डवर मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील दोन कोटी ८२ लाख६९ हजार ३६२ लोकसंख्येला १४ लाख १३ हजार ४७० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जून २०२० मध्ये आतापर्यंत ३ लाख २५ हजार६० क्विंटल वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे २ लाख ३ हजार १७९ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेच्या अन्नधान्य लाभ मे व जून २०२० या दोन महिन्यासाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती पाच किलो मोफत तांदुळ दिला जात आहे आतापर्यंत ४७ हजार ११०क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.

Tags: Shiv Bhojan Thaliराज्यसंरक्षण मंत्री छगन भुजबळ
Previous Post

३१० अहवाल प्राप्तः ६५पॉझिटीव्ह, चार मयत, ७९ डिस्चार्ज

Next Post

सुशांत सिंह राजपूतप्रकरणी सलमानची पाठराखण करणं अभिनेत्याला पडलं महागात

RelatedPosts

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
Featured

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’
Featured

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर
Featured

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

September 15, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Next Post
Salman Khan

सुशांत सिंह राजपूतप्रकरणी सलमानची पाठराखण करणं अभिनेत्याला पडलं महागात

akola corona updates

आज ३४ रुग्णांची भर तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु,आकडा १३४० पार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

September 17, 2025
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार स्वस्थ नारी, सशक्त परिवार’अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

September 17, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.