अकोला,दि.२४- शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत करावयाची कागदपत्रांची पडताळणी ही शाळा स्तरावरच राबवावी व संकलन करुन पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येणार आहेत.
त्यासाठी ज्या पाल्यांचे नाव ऑनलाईन पद्धतीने २५ टक्के प्रवेशासाठी ज्या शाळेत निवडले गेले आहे, त्या पालकांनी आपल्या पाल्याचे सर्व कागदपत्रांचा मुळ संच दि.२४ जून नंतर संबंधित शाळेत सादर करावे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी शिक्षण संचालकांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे निकोप पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.
अधिक वाचा: मोरगाव भाकरे सतरंजीचे गाव म्हणून नावलौकीक मिळवणार- पालकमंत्री ना. बच्चू कडू