मूर्तीजापुर (सुमित सोनोने):- संत गाडगे महाराज गौरक्षण संस्थान येथे मूर्तिजापूर च्या विविध संदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी संपूर्ण आढावा घेतला आहे.
सर्वप्रथम संत गाडगे महाराज नामदार बच्चू कडू यांनी यांना अभिवादन केले.उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते तहसीलदार प्रदीप पवार मुख्याधिकारी विजय लोहकरे, संत गाडगे महाराज संस्था अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, उपस्थित होते.
मुर्तीजापुर नगरपरिषद देणारे विविध समस्यांसंदर्भात माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिलेल्या विविध निवेदन संदर्भात पालकमंत्री यांची आढावा बैठकीत त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मुर्तीजापुर चा पाइप लाइन चा प्रश्न घरकुल मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच बेवारस पडलेली पाण्याची टाकी असे अनेक विषय माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी निर्माण करून निकाल काढण्यासाठी आग्रा केला पालकमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना धारेवर धरून आतापर्यंत तीन किलोमीटर पाणीपुरवठा योजना का पूर्ण झाली नाही. यासंदर्भात जाब विचारले असताना येथील एमजीपी अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला 33 हजार रुपये रोज प्रमाणे दंड लागू आहे दोन वर्षापासून ही योजना रखडलेली आहे. संबंधित ठेकेदाराला त्वरित कारवाई करून सदर योजना पूर्ण करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ता संदीप यांनी सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे विरोधात काम न केल्यामुळे 26 जनवरी 2019 ला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांनी काही कनेक्शन करून दिले तर काही उरलेले क्रॉस कनेक्शन व लिकेज स्वखर्चाने संदीप जळमकर यांनी करून घेतले असल्याचे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले या बैठकीला नगरसेवक तसलीम खान देविदास घोडे कैलास महाजन अंकित अग्रवाल प्रहारचे तालुकाध्यक्ष संतोष इंगोले नगरपरिषद अभियंता पुरुषोत्तम पोटे व इतर अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी मुर्तीजापुर पाइपलाइनची समस्या निकाली काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे.