मुंबई, दि. २४:- लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग न घेता सरसकट तींन महिन्याचे वीजबिल ग्राहकांना देण्यात येत आहे.ह्या मध्ये प्रत्येक महिन्याचे वीज बिल नसून सरासरी पद्धतीने महावितरणने युनिट आकारले असून वीजग्राहकांची लूट करण्यात येत आहे.या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.तथापि ही सवलत नसून शासकीय लूटीला राजाश्रय देण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेण्यात आले नाही.त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आले.मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात येत आहे.या बिलामध्ये ग्राहकांची प्रचंड लुट करण्यात येत आहे.ही सरासरी बील आकारताना एकूण तीन महिन्याचे बिल एकत्र केल्याने युनिट दर हा ५०० युनिट वर जाताच त्याचे दरात मोठी वाढ झाली आहे.गृहीत धरा की तीन महिन्याचे सरासरी बिल हे ६६४ युनिट असेल तर त्याला ११. ७१ प्रमाणे आकार लागेल व त्याचे तीन महिन्याचे बिल हे ७७७५ इतके होईल.शिवाय त्या मध्ये इतर चार्ज समाविष्ट केल्यास त्याची रक्कम ८४०० इतकी होते.हेच बिल दरमहा आकारले तर ६६४ भागीला तीन महीने केले असता दरमहा २२१.३३ इतका वीज वापर येतो.त्याचा वीज दर २२१.३३ x ७. ५० पैसे केला तर हे बिल १६५९. ७५ होईल.आणि दरमहा १६५९.९७ प्रमाणे वीज बिल असल्यास तीन महिन्याचे ४९७९.९२ इतके वीज बिल होते.परंतु महावितरणने हे सरासरी बिल देताना ८४०० इतके दिले आहे.कारण एकत्रित बिलामुळे वीज आकारात वाढ झाली आहे.वीज बिल आकारणी करताना घरगुती वीज ग्राहकास १०० युनिट पर्यंत चा दर हा २५७ पैसे अधिक इंधन समायोजन आकार घेतला जातो.१०० ते ३०० युनिट पुढे ४५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार लावला जातो.३०० ते ५०० युनिट चा ६५१ पैसे तर ५०१ ते १००० युनिट पर्यंत ७५५ पैसे आणि १००० युनिट पुढे हा आकार ७८१ पैसे आहे.
ही दर आकारणी पाहता दरमहा १०० ते ३०० युनिट साठी ४५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार असलेल्या ग्राहकांना सरासरी बिलामूळे ५०० युनिट पेक्षा अधिकचा ७५५ पैसे दर लावण्यात आला आहे.त्यामुळे वीज बिलात जवळ जवळ दुप्पटीने वाढ झाली आहे.हा ग्राहकाच्या खिश्यावर टाकलेला सरकारी दरोडा आहे. ही महावितरणची मनमानी आहे.
एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्याचे.तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येईल, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले आहे.परंतु वीज बिल न भरता ही दुरुस्ती होणार नाही.त्यामुळे दिलेल्या रकमेच्या अवाजवी वीज बिलाचा भरणा ग्राहकाला करावा लागेल.सोबतच बिल कमी करण्यासाठी किंवा दुरुस्त्या साठी वीज कार्यालयाच्या फे-या माराव्या लागतील.
महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही, असे ऊर्जामंत्री सांगत असले तरी जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या सरासरी युनिट प्रमाणे दिले आहे.त्यामध्ये ग्राहकांना लुटण्यात येत आहे.सबब वीज ग्राहकांनी ही अवास्तव वीज बिलाचा भरणा करू नये. https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ह्या लिंकवर जाऊन आपल्या रीडिंगची तपासणी करावी.आणि सरासरी बिल न घेता दरमहा बिल (तीन स्वतंत्र बिल) घेऊनच वीज बिलाचा भरणा करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.