पिंजर (प्रतिनिधी)- आयुष्य मंत्रालय,भारत सरकार द्वारा प्रमाणित Aresunicum album. औषधाचे पिंजर ग्रामपंचायतच्या वतीने डाॅ.अमोल कुचर यांच्या मार्गदर्शनाखाली 23 जुन पासुन मोफत वाटप चालु. पिंजर येथील सर्व कुटुंबाना मिळणार मोफत लाभ.यावेळी आयोजित शिबिरात डाॅ.अमोल कुचर यांनी या औषधा विषयी योग्य माहीती देऊन याबद्दल गोळ्या घेण्याची पद्धती आणी यामुळे होणारे फायदे.तसेच वाटपाची पद्धती बाबतचे मार्गदर्शन केले.कोविड -19 त ग्रा.पं.पिंजर आणी प्रा.आ.केंद्र पिंजर, पोलिस स्टेशन पिंजर, महसुल,पत्रकार बांधवासह व देखरेख समिती सह गावातील सर्व घटकांनी मिळुन या काळात कार्यरत होते.यामध्ये विविध उपाययोजना करुन गेल्या तिन महिन्यात पिंजर शहर हे रोगमुक्त ठेवण्यात मोठे यश आल्याचे मत यावेळी मान्यरांनी आपल्या भाषणातुन सांगितले.या पुढेही गावातील प्रत्येक कुटुंबाची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होईल.यासाठी ग्रा.प.पिंजरच्या वतीने हे औषध उपलब्ध करुन वाटप करण्याचे आयोजन केले.तसेच काल सुरक्षेच्या दृष्टी कोणातुन ॲटोमॅटिक सॅनिटायझर मशिन ग्रा.प.कार्यालय पिंजर येथे लावण्यात आली आहे.कार्याकमाला सरपंच सौ.अंजली अशोक इंगळे,पिंजर पो.स्टे.ठाणेदार राजु भारस्काळे साहेब,उपसरपंच सगीर भाई सौदागर,जावेद भाई पं.स.स., ग्रा.पं.स.दिपक सदाफळे,विठ्ठल वडुरकर,अन्सार कुरेशी,सुभाष गोरवे,श्री.नयनकुमार जयस्वाल, श्री.राजुबाप्पु देशमुख,श्री.बंडु राऊत मा.ता.प्र,श्री.पांडुरंग ठक,श्री.जावेद कमाणी,श्री.अशोक इंगळे,मा.पं.स.सदस्य. ग्रामविकास अधिकारी श्री.थोरात साहेब,श्री.प्रदिप पाटील गावंडे प्रत्रकार, अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेवीका आणी गावातील नागरिक ग्रा.पं.कर्मचारी उपस्थित होते.औषधाचा लाभ गावातील प्रत्येक कुटुंबांनी घ्यावा असे आव्हान ग्रा.प.पिंजर यांनी केले. तसेच या औषधांचे वाटप गावातील प्रत्येक कुटुंबाला आशा सेविका यांच्या मदतीने घरोघर जाऊन औषधी वाटप करण्याचे नियोजन केले.कार्यक्रमात उपस्थितीतांनी कोविड -१९ संबंधित माहिती व उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन महेश घनगाव यांनी केले.तर उपसरपंच सगीर सौदागर, यांनी आभार प्रदर्शन केले.