अकोला,दि.२२ – अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅटि्कोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.
सन २०१८-१९ तसेच सन २०१९-२० मधील ज्या पात्र विद्यार्थ्यांना प्रथम टप्याचा लाभ मिळाला आहे व ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही व्दितीय टप्याचा लाभ मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांनी प्रपत्र १ व ३ अर्ज परिपूर्ण भरुन (प्राचार्यांच्या सहि व शिक्यानिशी) या कार्यालयात दिनांक १० जुलै पूर्वी सादर करावा. जेणेकरुन संबंधित विद्यार्थ्यांना व्दितीय टप्याची रक्कम त्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यामध्ये जमा करणे या कार्यालयास सोईचे होईल. कार्यालयात प्रपत्र १ व ३ सादर करतांना विद्यार्थ्यांनी स्वतःचे बॅंकेचे पासबूक अपडेट करुन सोबत घेवून यावे. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही,अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.