अकोट(देवानंद खिरकर )-सद्या पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांनि आपल्या शेतामध्ये पेरणी आटोपली असुन त्या करिता विविध तालूक्यातिल कृषीसेवा केंद्रा वरुन सोयाबीनचे बियाणे विकत घेतले. व बियाणे शेतात पेरल्या नंतर बियाणे उगवलेच नाही. व काही शेतकर्याच्या शेतातील बियाणेची फक्त 20 टक्केच उगवण झाली आहे.
यामूळे कोरोना महामारीच्या काळात शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. करिता शेतकरी बांधवांनि ज्या कृषीसेवा केंद्रा कडून किवा विक्रेत्या कडून बियाणे विकत घेतले त्यांच्या कडून शेतकरी बांधवांना पेरणीसाठी नव्याने बियाणे व पेरणीचा खर्च देण्यात यावा. व सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करून सबंधीत कंपनिच्या प्रतिनिधींना सदर सोयबिच्या शेताची पाहणी करायला लावुन त्या शेतकर्याचे बियाणे खरोखरच ऊगवले नाही व बोगस निघाले त्या शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यात यावा व सदर कंपनीवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा भारतिय जनता युवा मोर्च्याच्या वतीने अकोट तालुक्यात विविध ठिकाणी तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा सुध्दा दिला आहे. नीवेदन देतेवेळी प्रवीण डिक्कर, गोपाल मोहोड, उमेश पवार, संतोष जायले, चेतन जायले, संतोष हिवरे, हे उपस्थित होते.