अकोट(देवानंद खिरकर): विदर्भासह महाराष्ट्रात सावकाराविरोधी कठोर कार्यवाहीची सुरूवातच विद्याताई मुळे झाली आहे. मा.विद्याताईंनि मागिल 6 वर्षात प्रत्येक.अधिवेशनात अवैध.सावकारीचा मुद्दा मांडला. मा.ना.देवेंद्रजी फडणविस यांनी घोषित केलेल्या फसव्या सोने तारण कर्जमाफी योजनेतील 85,000 शेतकरी लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते.
त्यांना मा.विद्याताई मुळे योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र मधिल हजारो सावकार ग्रस्त शेतकरी कुटुंबाची शेती परत प्राप्त करुन देण्याकरिता मा.विद्याताईची सभागृहात अत्यंत आवश्यकता आहे. मा.विद्याताई मुळे आमच्या सारख्या सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना विधानभवनात प्रवेश मिळाला.
तसेच मातंबर व जेष्ठ नेत्यांच्या भेटी घडूण आल्यात.स्व.आर आर पाटील यांचे सावकार मुक्त महाराष्ट्र राज्याचे स्वप्न पुर्ण होण्याकरिता मा.विद्याताई चव्हाण यांची सभागृहात अत्यंत आवश्यकता आहे. त्यामूळे सर्व सामन्य शेतकरी वर्गाचे भावनांचा विचार करुन शेतकरी यांचा प्रतिनिधी म्हणून मा.विद्याताई चव्हाण यांची नियुक्ती करण्यात यावी. व सावकार ग्रस्त शेतकरी यांचा आधारवड विधिमंडळात कायम ठेवावा या बाबत मा.शरदजी पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना निवेदन देण्यात आले आहे.