• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बॅंकिग क्षेत्राने रेपो दरात कपात केल्यानंतरच्या व्यवहारांवर सरकारचे बारिक ल‌क्ष तसेच भारताच्या यशोगाथेत योगदान देणारया उद्यमींच्या संपत्ती निर्मितीच्या प्रयत्नांची ओळख पटविणार- वित्तमंत्री

Media Desk by Media Desk
June 20, 2020
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
Nirmala Sitaraman
54
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. संपत्ती निर्माण करणारे रोजगारांची निर्मिती करत असतात आणि संसाधनांचा सुयोग्य वापर करून देशाच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना देत असतात, त्यामुळे सरकारने नेहमीच त्यांचे महत्त्व लक्षात घेतले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांनी नेहमीच एमएसएमई क्षेत्राचे महत्त्व ओळखले आहे आणि त्यांना मदतीचा हात दिला आहे, असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले.

सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या पॅकेजमधील तरतुदींचा लाभ तळागाळातील  लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे विशेषतः रेपो दरातील कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत कमी व्याजदरांच्या रुपात पोहोचत आहे की नाही यावर आम्ही बँकांशी सल्लामसलत करून बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती त्यांनी या बैठकीत दिली. कोविड-19 महामारीचा व्यापार आणि उद्योगावर झालेला विपरित परिणाम कमी करण्यासाठी सरकारने व्यवसायांना जाहीर केलेल्या तारण विरहित 3 लाख कोटी रुपयांच्या स्वयंचलित कर्ज योजनेअंतर्गत कर्जाचे वितरण कशा प्रकारे होत आहे याकडेही सरकारचे बारीक लक्ष आहे,  असे त्यांनी सांगितले. उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने नेहमीच किमान सरकार आणि कमाल प्रशासनावर भर दिला आहे आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन दिले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारने कोणताही भेदभाव न करता सर्व उद्योगांना विशेषतः एमएसएमईंना नेहमीच मदतीचा हात दिला आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. डी के अग्रवाल यांनी यावेळी सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वाच्या सुधारणांची प्रशंसा केली. सरकारने जाहीर केलेले 20.97 लाख कोटी रुपयांचे आर्थिक मदतीचे पॅकेज अतिशय समावेशक, भरीव आणि जगातील इतर देशांनी जाहीर केलेल्या सर्वात मोठ्या पॅकेजपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले. हे पॅकेज केवळ आर्थिक आणि वित्तपुरवठाविषयक बळ देणारे पॅकेज नसून भारताला नव्या उंचीवर नेणाऱ्या आमूलाग्र बदल घडवणाऱ्या उपाययोजना त्यात समाविष्ट आहेत, असे ते म्हणाले.

पर्यटन, हवाई वाहतूक, मनोरंजन, बांधकाम, वाहन उद्योग आणि अशाच इतर काही मोठ्या प्रमाणावर झळ बसलेल्या क्षेत्राच्या वर्गीकरणावर कोणताही परिणाम होऊ न देता कर्जाची एकदाच पुनर्रचना करणे ही काळाची गरज आहे, अशी सूचना त्यांनी केली. सरकारला बँकर्सच्या मनातून कर्ज वितरणासंदर्भात असलेली भीती दूर करण्यासाठी अधिकृत संपर्क साधता येऊ शकेल, जेणेकरून बँक अधिकारी कोणत्याही दडपणाविना व्यापार आणि उद्योगांना कर्ज मंजूर करू शकतील आणि त्याचे वाटप करू शकतील, अशी सूचनाही अग्रवाल यांनी केली. एखाद्या उद्योगाने घेतलेले कर्ज खरोखरच काही योग्य कारणांमुळे चुकते करण्यात अपयश आले असेल तर त्या उद्योगांविरोधात फौजदारी कारवाई होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारने केलेल्या वाढीव खर्चामुळे मागणीमध्ये तातडीने वाढ होण्याची आणि त्याचवेळी स्थानिक उद्योगांमध्ये स्पर्धात्मकता वाढीला लागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या उद्योगांना जलदगतीने मजूर, कायदा आणि भूमीविषयक सुधारणांचे लाभ मिळाले पाहिजेत आणि भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक स्थान बनला पाहिजे, असे अग्रवाल यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली कोविड-19च्या विरोधातील लढाईत भारत विजयी होईल, असा विश्वास पीएचडी चेंबरला वाटत आहे. या अतिशय कठीण कालखंडात सरकार आणि समस्त देशवासीयांना पीएचडी चेंबरचे संपूर्ण पाठबळ असल्याची ग्वाही डॉ. अग्रवाल यांनी दिली. या चेंबर समितीच्या सदस्यांच्या शंकांचे अर्थमंत्र्यांनी अतिशय मनमोकळेपणाने निरसन केले आणि देशाची अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगाशी संबंधित विविध पैलूंबाबत सदस्यांनी केलेल्या सूचना लक्षात घेतल्या. यामध्ये भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाचे अर्थ सचिव अजय भूषण पांडे, वित्तीय सेवा विभागाचे सचिव देबाशिष पंडा, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव राजेश वर्मा, मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमनियन, पीएचडी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय अग्रवाल, पीएचडीचे उपाध्यक्ष संजय मुलतानी, सरचिटणीस सौरभ सन्याल आणि पीएचडीचे माजी अध्यक्ष आणि समिती सदस्य यांच्यासारखे मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

Previous Post

कोरोना विषाणुच्या संकट काळात तरी अकोलकर व देशवाशियाना लुटू नका- कॉ. रमेश गायकवाड

Next Post

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची देशांतर्गत उत्पादन क्षमता दरमहा 10 कोटी गोळ्यांवरून (सुमारे) तीन पट वाढून दरमहा 30 कोटी (सुमारे) गोळ्यांवर पोहोचली

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची देशांतर्गत उत्पादन क्षमता दरमहा 10 कोटी गोळ्यांवरून (सुमारे) तीन पट वाढून दरमहा 30 कोटी (सुमारे) गोळ्यांवर पोहोचली

लोक अदालत

पोलिसांना हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.