पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये चीनशी झालेल्या संघर्षाविषयी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठक अजूनही सुरू आहे. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहभागी होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुरूवातीला संबोधन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात या विषयावर विरोधकांचा पाठिंबा मागितला आहे.
यावेळी राजनाथ सिंह यांनी गलवान खोर्यात झालेल्या त्यांच्या पातळीवरील संघर्षाची माहिती विरोधी पक्षातील नेत्यांनाही दिली. लडाखच्या गलवान खोर्यामध्ये १५ जूनच्या रात्री झालेल्या रक्तरंजित चकमकीत भारतीय सैन्य दलातील २० जवान शहिद झाले. या घटनेनंतर पंतप्रधानांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी पाच वाजता बोलावलेल्या या बैठकीत एकूण २० राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. या बैठकीला केवळ पाच खासदार असलेल्या पक्षांना बोलावण्यात आले आहे. यामुळे आम आदमी पार्टी, आरजेडी, एआयएमआयएम यासारख्या अनेक पक्षांना पंतप्रधान बैठकीला या बैठकीला बोलावलेले नाही. त्यामुळे या पक्षांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
या बैठकीत जेपी नड्डा (भाजपा), सोनिया गांधी (आयएनसी), एमके स्टालिन (द्रमुक), जगन रेड्डी (वायएसआर सी), शरद पवार (राष्ट्रवादी), नितीशकुमार (जदयू), डी. राजा (भाकप), सीताराम येचुरी (सीपीआय एम), पिनाकी मिश्रा (बीजद), के.के. चंद्रशेखर राव (टीआरएस), ममता बॅनर्जी (टीएमसी), सुखबीर बादल (एडी), चिराग पासवान (एलजेपी), उद्धव ठाकरे (शिवसेना), राम गोपाल यादव (एसपी), मायावती (बसपा), रामदास आठवले (आरपीआय), कर्नेद संगमा (एनपीपी), प्रेमसिंग तमंग (एसकेडी), पू जोरामथांग (एमएनएफ) हे सर्व सहभागी आहेत.