अकोला, दि. १७ : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉक डाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नागरिकांचा व सेवाभावी संस्थांचा मदतनिधी देण्याचा ओघ सुरुच आहे. आज पर्यत जिल्ह्यात एक कोटी ४४ हजार ३९४ रुपयांचा मदत निधी जमा झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आज पर्यंत प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी २६ धनादेश प्राप्त झाले असून ते १६ लक्ष ७८ हजार ५०० रुपये इतक्या निधीचे आहे. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १७४ धनादेश प्राप्त झाले असून त्याव्दारे ८३ लक्ष ६५ हजार ८९४ इतक्या रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात असा एकूण एक कोटी ४४ हजार ३९४ रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.