अकोला,दि.१६- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०६ अहवाल निगेटीव्ह तर ३२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर सायंकाळी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोन जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित १६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १०७३ झाली आहे. आजअखेर ३४१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७५४८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७२३२, फेरतपासणीचे १३० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७५४० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६४६७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १०७३ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३२ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. त्यात आज सकाळी प्राप्त अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तर आज सायंकाळच्या अहवालात ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११ महिला व २१ पुरुष आहेत. त्यातील सात जण चावरे प्लॉट येथील पाच जण बाळापूर येथील दोन जण गुलजारपुरा, दोन जण सिंधी कॅम्प, दोन जण वाशीम बायपास, दोन जण मोठी उमरी, दोन जण तारफैल येथील तर उर्वरीत शंकरनगर, अकोट फैल, खदान, इंदिरानगर वाडेगाव, डाबकी रोड, आदर्श कॉलनी, महाकाली नगर, खेतान नगर, चांदुर खडकी, खामखेड वाडेगाव रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तीन जणांचा मृत्यू
आज दिवसभरात तीन जणांचे मृत्यू नोंदविण्यात आले. काल(दि.१५) रात्रीउपचार घेताना एक ५० वर्षीय महिला मयत झाली. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून दि.१३ रोजी दाखल झाली होती. काल रात्री तिचा मृत्यू झाला. तर आज दुपारनंतर दोघांचा मृत्यू झाला. त्यात एक बाळापूर येथील ७४ वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण दि.१३ रोजी दाखल झाला होता. त्याचा आज मृत्यू झाला. तर अन्य एक बार्शी टाकळी येथील ६२ वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण दि. २६ मे रोजी दाखल झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१८ जणांना डिस्चार्ज
आज दुपारनंतर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोघांना कोविड केअर सेंटर येथे तर उर्वरित १६ जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. ह्या रुग्णांपैकी खदान येथील तिघे, तारफैल येथील दोघे, खडकी येथील दोघे तर सिंधी कॅम्प, मोहता मिल, मोठी उमरी, बाळापूर, देशमुख फैल, गोरक्षण रोड, दीपक चौक, ध्रुव अपार्टमेंट,जीएमसी होस्टेल, सिटी कोतवाली, अकोट फैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३४१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १०७३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ५६ जण (एक आत्महत्या व ५५ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ६७६ आहे. तर सद्यस्थितीत ३४१ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.