अकोट (देवानंद खिरकर): सोनाळा पोलीस स्टेशन समोरुन रविवारी सहा जणांना अस्वलाच्या दोन मृत पिल्ला प्रकरणी ताब्यात घेतले होते.अस्वलाच्या पिलांची हत्या संग्रामपुर तालुक्यातील निमखेडी येथिल या सहा सहा जणांनी केली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना 18 जुन परंत वनकोठडी सुनावली आहे.संग्रामपुर तालूक्यातील अंबाबारवा अभयारण्यात दक्षिण आलेवाडी बिट कंपार्टमेंट क्रमांक 357 खडक पाणि पाणवठ्याजवळ 11 रोजी दोन आदिवासीवर अस्वलाने हल्ला करुन ठार केले होते.घटनास्थळावरुन काही अंतरावर मृत अवस्थेत अस्वलाची दोन नरजातीचे पिल्ले आढळून आले होते.त्या प्रकरणाचे बनाव करुन 11 रोजी सोनाळा पोलिस स्टेशनला हबू पवार याने आठ जण गुरे शोधण्यासाठी अभयारण्यात गेलो असता दोघावर हल्ला चढवील्याची फिर्याद दिली होती.
प्रतिबंधक क्षेत्रात बेजायदेशीररीत्या प्रवेश कल्या प्रकरणी वन्यजीव विभागाने हबू पवार,मुन्ना चिंचोलकर,राजू कासोटे,कृष्णा गवते, डालू जांभुळकर,अंकेश पवार,असे सहा जणांना रविवारी संध्याकाळी साडेचार,ते पाच वाजताच्या दरम्यान ताब्यात घेतले.या सहा आरोपिंची कसून चौकशी केली असता सदर आरोपी प्रतिबंधक क्षेत्रात बांबू तोडण्यासाठी गेले होते.जंगलात जात असतांना समोरुन येत येणार्या दोन अस्वल पिल्लांना त्यांनी कूर्हाळ,दरातीने मारहाण केली.यात अस्वलाच्या पिल्लांचा मृत्यू झाला.यावेळी सहा जण पळून गेले होते.दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी संग्रामपूर न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने आरोपींना 18 जुन परंत वन कोठडी सुनावली आहे.