तेल्हारा (प्रतिनिधी)- एकता मंडळ इंदिरा नगर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज नगरसेविका सौ.आरती गायकवाड यांच्या ऊपस्थीतीत प्रभाग क्र.८ मधील इंदिरा नगर ,तापडीया नगर तथा भारत नगर व तिरुपती नगर येथे रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे होमिओपॅथी औषधी आरसेनिक एल्बम ३० चे मोफत वाटप करण्यात आले.
देश,धर्म,व समाजीक कार्यात सदैव तत्पर असलेले रास्वसं तसेच अशाच प्रकारे विविध समाज ऊपयोगी कार्यक्रम राबणारे एकता मंडळ यांच्या तर्फे या औषध वाटप करतांना ते कसे व कीती दीवस घ्यायचे याची माहिती देण्यात आली,
यावेळी शिंगणारे सर,गजानन मुंजे,ऋषीकेश नळकांडे,सुनील बावस्कर, दीपकभाऊ पुंडकर,फकीरचंद भट्टड,प्रवीण भाऊ ऊजाड,वासुदेव गावत्रे,गजानन गायकवाड, प्रवीण ढोके,गजानन अम्रुतकार,राहूल मानकर,शिवा अम्रुतकार, अभी गोमासे,गजानन वानखडे,शैलेश ढाळे,पंकज पोहरकार,शुभम अंजनकार, बाबचलाल चाफे सुरज अम्रतकार यांनी सर्व परीसरात घरोघरी जाऊन या औषधीचे वाटप केले..