अकोला दि. १५ – कोरोनाचा पार्शवभूमीवर खरीप हंगामात खते , बियाणे देण्याचा उपक्रम राज्य सरकारने कृषी विभागाच्या मदतीने आखला असल्याची राणा भीमादेवी घोषणा करणारे राज्य सरकार पुरते तोंडघशी पडले आहे. शेतक-यांना घरपोच बियाणे व खते रास्त भावात देण्याची घोषणा वांझोटी ठरल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली असून सरकारने बळी राज्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याने बळीराजा तीव्र नाराज आहे. सरकारने तातडीने पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील वंचित ने केली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्शवभूमीवर कृषी सेवा केंद्रावर गर्दी करणे नका,शासनाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन खते व बियाणे ह्यांची मागणी नोंदवा.घरपोच रास्त दरात पुरवठा करण्याचे आश्वासन सरकरणे दिले होते. राज्यात बियाण्यांचा तुटवडा नसून विशीष्ट कंपनीचेच खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना सक्ती केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून आतापर्यंत १८ हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून ६० हजार मेट्रिक टन खते, २० हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. राज्यात सोयाबीनसह कुठलेही खते आणि बियाणे कमी पडू दिले जाणार नाही.राज्यात युरियाचा ५० हजार मेट्रिक टन अतिरिक्त साठा करून ठेवण्यात आला आहे.असा दावा कृषीमंत्री दादाजी भुसे ह्यांनी केला होता.कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून आतापर्यंत १८ हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून ६० हजार मेट्रिक टन खते, २० हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.हे देखील त्यांनी जाहीर केले होते.मात्र त्यांचा हा दावा बोलाचीच कढी ठरला आहे.
राज्यातील कृषि भौगोलिक क्षेत्र : ३०७ लाख हेक्टर असून लागवडीलायक क्षेत्र :१७४ लाख हेक्टर आहे. त्यापैकी कोरडवाहू क्षेत्र ८१ टक्के असून एकूण शेतकरी संख्या – १.५२ कोटी इतकी आहे. एकूण बियाणे गरज: १६.१५ लाख क्विंटल आहे.खरीप हंगाम २०२० साठी अंदाजित बियाणे उपलब्धता : १७.५१ लाख क्विंटल (महाबीज- ५.०८, राबिनि-०.३१ व खासगी-११.८६ लाख क्विंटल.) खरीप हंगाम २०२० (एप्रिल ते सप्टेंबर) करीता एकूण ४० लाख मे.टन खते मंजूर. खरीप २०२० मध्ये सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र : ४० लाख हेक्टर आहे. एकूण बियाणे गरज: १०.५० लाख क्विंटल.संभाव्य सोयाबीन बियाणे उपलब्धता: महाबीज – ३.९१ लाख क्विंटल + राबिनि – ०.२२ लाख क्विंटल + खासगी- ७.११ लाख क्विंटल = एकूण ११.२४ लाख क्विंटल.राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून ९८ टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड. या क्षेत्रासाठी १ कोटी ७० लाख बियाणे पाकिटांचे आवश्यकता. कापूस कंपन्यांनी २ कोटी ७२ लाख पाकिटांचे पुरवठा नियोजन केले असे जाहीर केले होते. त्यामुळे राज्यात कापूस बियाणे पाकीट यांचा तुटवडा भासणार नाही.असा दावा देखील करण्यात आला होता. खत पुरवठा नियोजन ४० लाख मेट्रीक टनाचे नियोजन आहे, हे कृषी विभाग सांगत होता.
कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे पोहोचविण्यासाठी १७ हजार ११४ शेतकरी गटा मार्फत पोहचविण्याचे आश्वस्त करण्यात आले होते. ठाणे विभाग- ५६७, कोल्हापूर विभाग- १७६६, नाशिक विभाग- १२०१, पुणे विभाग- ४४५२, औरंगाबाद विभाग- ९८९, लातूर विभाग- १६६८, अमरावती विभाग- १९४८, नागपूर विभाग- ४५२३ असे शेतकरी गट कार्यरत असल्याची आकडेवारी माध्यमांना देण्यात आली होती. ४४ हजार कोटींच्या पीक कर्जाचे उद्धिष्ट ठरवून ३२ लाख खातेदारांना लाभ देण्याचे सरकारी नियोजन मे महिन्याचे होते,सहकार विभागाने खरीप हंगामात ४४ हजार २५ कोटी रुपये पीक कर्ज पुरवठ्याचे उद्धिष्ट निश्चित केले होते.
राज्यात पावसाचे आगमन होताच सरकारी आकडेवारीचे पितळ उघडे पडले आहे.सरकारी नियोजन हे कागदी वाघ ठरला आहे.शेतका-यांच्या बांधावर रास्त दरात खते व बियाणे देण्याची घोषणा निव्वळ वांझोटी ठरली आहे. अकोला जिल्ह्यासाठी ३७ हजार ७७० क्विन्टल बियाणाची मागणी होती.यातील महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे २३,७०७ क्विन्टल बियाणे बाजारात उपलब्ध झालीत. त्यापैकी १६,२३२ क्विन्टल बियाणांची विक्री झाली खाजगी कंपन्या कडून १८,५०० क्विन्टल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली होती.त्यांना २१,६९७ क्विन्टल पुरवठा झाला. त्यातील १२,१३१ एवढीच विक्री झाली आहे. अर्थात जिल्ह्यात उपलब्ध बियाणा पैकी १७,०४१ क्विन्टल बियाणे विक्री झाली नाही, ती शिल्लक असताना बाजारात सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा कृत्रिम असून काळाबाजार करण्यासाठी हा सर्व खेळ सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात खते, बियाणे व कर्ज माफी ह्या तिन्ही बाबींवर सरकार कडून निव्वळ घोषणा करण्यात येत असल्याने शेतकरी वंचित राहिला आहे.काळाबाजार करणारे राजरोस शेतक-यांना लुटत आहेत.
सरकारने हा काळाबाजार तातडीने थांबवून शेतक-यांना योग्य दरात खते व बियाणे तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.