अकोला,दि.१५- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १४३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०९ अहवाल निगेटीव्ह तर ३४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर सायंकाळी २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित १६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १०४१ झाली आहे. आजअखेर ३३० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७४१९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७१०३, फेरतपासणीचे १३० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७४०२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६३६१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १०४१ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३४ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात तिघांचे अहवाल पॉझिटीव्हि आले. त्यातील तीनही रुग्ण पुरुष असून ते शिवसेना वसाहत, तार फ़ैल व शिवाजीनगर येथील रहिवासी आहेत. तर सायंकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले. त्यात १३ महिला तर १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यात सिंधी कॅम्प मधील नऊ, बाळापूर येथील चार, चांदूर रोड येथील तीन, खदान येथील दोन, जीएमसी होस्टेल येथील दोन तर आदर्श कॉलनी, डाबकी रोड, शिवाजी नगर, हिंगणा , रणपिसे नगर, रामदास पेठ, अकोट फैल, बार्शी टाकळी, शिवनी, अंबिकानगर, गंगानगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
दोन जणांचा मृत्यू
आज दोघांचे मृत्यू झाले. त्यातील हा रुग्ण ५८ वर्षीय पुरुष असून तो दि.१२ रोजी दाखल होता. त्याचा दि.१३ रोजी मृत्यू झाला होता.त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. दरम्यान आज दुपारुन आणखी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण फिरदौस कॉलनी येथील ७५ वर्षीय पुरुष असून तो दि. २ रोजी दाखल होता. त्याचा उपचार घेतांना आज मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
२१ जणांना डिस्चार्ज
आज दुपारनंतर २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १६ जणांना घरी सोडण्यात आले तर पाच जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात नऊ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात खदान येथील चार, सिंधी कॅम्प येथील चार, रामदास पेठ येथील दोन तर विजय नगर, गुलजार पुरा, कौलखेड, सावकारनगर, भारती प्लॉट, शास्त्री नगर, सोनटक्के प्लॉट, कमला नेहरु नगर, कैलास टेकडी, जीएमसी क्वार्टर, नायगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३३० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १०४१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ५३ जण (एक आत्महत्या व ५२ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ६५८ आहे. तर सद्यस्थितीत ३३० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.