• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; तपासण्यांची संख्या वाढवा!

Team by Team
June 15, 2020
in Featured, Amravati, विदर्भ
Reading Time: 1 min read
77 1
0
Instruction of bacchu kadu
23
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती, दि. 15 : चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे कोरोनाचा रूग्ण आढळला. या पार्श्वभूमीवर लक्षणे आढळणा-या व्यक्तींच्या तपासण्यांची संख्या वाढवावी व ग्रामीण रूग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा, असे आदेश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी चांदूर बाजार येथे नुकतेच दिले.

राज्यमंत्री श्री. कडू यांनी नुकतेच चांदूर बाजार तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बोरखडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. त्यात सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण रूग्णालयात वेगळा कक्ष उभारून मनुष्यबळ वाढवावे. आवश्यक मनुष्यबळ व साहित्याचा प्रस्ताव द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यानिमित्त आरोग्य सुविधा व इतर कामांचाही आढावा त्यांनी घेतला.

वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवा

सध्या पेरणीचा हंगाम असल्याने कृषी केंद्रात जास्त भावाने बियाणे, खते विकण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नकली बियाण्यांचाही शिरकाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी केंद्रावर खरेदीसाठी जाणा-या नागरिकांत सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाने वेषांतर करून कृषी केंद्रांवर पाळत ठेवावी व वेळोवेळी तपासणी करावी. कुणीही दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.

बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख, दीपक भोंगाडे, ठाणेदार उदयसिंग साळुंके, सचिन परदेशी, नायब तहसीलदार अर्जुन वांदे, निलिमा मते, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, नारायण आमझरे, मुख्याधिकारी रवी पाटील, परिमल देशमुख, पूजा धर्माळे, राजेंद्र जाधव, डॉ. संध्या साळकर, डॉ. अमोल हरणे, डॉ. ज्योत्स्ना भगत आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: Amravatiविदर्भशिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
Previous Post

गाडेगावातील शिवसैनिकाचा आगळा वेगळा विवाह सोहळा, वृद्धाश्रमातील वृद्धांना मदतीचा हाथ

Next Post

श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्स; कोरोना प्रतिबंध दक्षतेसह मानसिक आरोग्यही जपण्याची गरज – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
e-conference

श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्स; कोरोना प्रतिबंध दक्षतेसह मानसिक आरोग्यही जपण्याची गरज - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

akola corona positive update report (6)

१४३ अहवाल प्राप्तः ३४ पॉझिटीव्ह, दोन मयत, २१ डिस्चार्ज; एकूण पॉझिटिव्ह -१०४१

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.