तेल्हारा (प्रतिनिधी)- अख्या जगात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. त्यात डॉक्टर ,पोलीस आपला जीव धोक्यात टाकून जनतेच्या रक्षणासाठी काम करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत तेल्हारा येथिल व्यावसाईक रवी निरंजन पाडिया यांनी आपला थाटात वाढदिवस साजरा न करिता वाढदिवसाचे औचित्य साधून तेल्हारा पोलिस स्टेशन ला दहा हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रॉनिक फागिग मशिन व सॅनिट्झर भेट देऊन पोलिसांन प्रति असलेली आपली जबाबदारी पार पडली आहे.
रवी पाडिया हे सामाजिक कार्यकर्ते असून ते विविध प्रकारचे कार्य करत असतात त्यांनी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये सामाजिक अंतर ठेवून तेल्हारा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विकास देवरे यांना इलेक्ट्रॉनिक फोगिंग मशीन व सॅनिट्झर चे वितरण केले व आवश्यकतेनुसार पोलीस स्टेशनला उपलब्धता करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ठाणेदार विकास देवरे ,निलेश देशमुख, राजू इंगळे, सुरेश काळे, अरुण हिवरळे, व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.