अकोला,दि.१२- कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जारी असलेल्या लॉक डाऊनच्या कालावधीत प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
सोशल डिस्टन्सिंग व केंद्र आणि सयंत्रांचे निर्जंतूकीकरण करणे, आलेल्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करणे त्यांच्या नोंदी ठेवणे इ. व अन्य कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या शर्तींसह ही परवानगी देत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.