अकोला,दि.१२- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भाव सद्यस्थितीबाबत आज सायंकाळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. नेताम, डॉ. राठोड, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी कोवीड उपचार सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी निर्देश दिले की, गरोदर माता व शस्त्रक्रियांसाठी दाखल होणाऱ्यांचेही घशातील स्त्राव घेण्यात यावे. ज्या भागात पॉझिटीव्ह रुग्ण अधिक आहेत अशा भागातील रुग्ण आढळलेल्या ठिकाणाहून १०० ते २०० मिटर परिसरातिल सर्व लोकांचे घशातील स्त्रावांचे नमुने घ्यावे. बाहेर गावाहून लग्नाचे वऱ्हाडातील संख्येवर निर्बंध अधिक कडक करा. अधिक संख्येने लोक येता कामा नये. बाळापूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात अधिक कडक उपाययोजना राबवाव्या. महात्मा फुले जन आरओग्य योजना व आरोग्य सेतू ॲप याबाबतही त्यांनी आढावा घेतला. सर्दी, ताप, खोकला या सारख्या आजारांच्या रुग्णांची नियमित तपासणी करावी, असे निर्देश दिले.