अकोट (देवानंद खिरकर)-संपुर्ण देशात सुरु असलेल्या कोरोना विषाणु या महामारीमुळे लॉक डाऊन सुरु करण्यात आले.त्यामुळे पंढरपूर यात्रे करीता विदर्भातील पालख्यांना नाकारण्यात आले होते. त्यामुळे विदर्भातील विश्व वारकरी सेनेची संपुर्ण वारकरी मंडळी मधे तिव्र नाराजीचा सुर उमटला होता. त्यामूळे सर्व वारकरी मंडळींनि दि.13 जुन पासुन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.परंतू अमरावती जिल्ह्यच्या पालकमंत्रि यशोमतीताई ठाकुर व विठ्ठल रुक्मिणी संस्थान अध्यक्ष ह.भ.प.गहिनाथ महाराज हौसीकर यांनी सांगितले की विदर्भातील वारकर्या सोबत दुजाभाव केला जाणार नाही. करीता वारकरी सांप्रदाय हा शिस्तीचा व शांततेचा भोगता आहे. म्हणून आपण सरकारच्या निर्णयाची 10 दिवस वाट पाहू. तरी सरकारने आपली भुमिका 10 दिवसात कळवावी अशी विनंती करण्यात आली आहे. करीता दि.13 जुन रोजी दिलेला आमरण उपोषणाचा इशारा आपण माघे घेत आहोत. व याच्या प्रति मा.मुख्यमंत्री साहेब यांना मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. असे ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना कळविले आहे.