अकोट (देवानंद खिरकर): मेळघात व्याघ्र प्रकल्प,अकोट वन्यजीव विभागमधिल वनपरीक्षेत्र सोनाळा,वरवट,बकाल वर्तुळ दक्षिण आलेवाडी नियत क्षेत्रात अस्वलाने दोघांवर प्राण घातक हल्ला चढवला.त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.या दोघांच्या मृतदेहापासून काही अंतरावर अस्वलाची दोन पिल्ले मृतवस्थेत आढळले त्यामुळे या दोन्ही पिलांना मारल्यामुळे अस्वल चवताळले असावे आणि त्याने दोघांवर हल्ला चढवला असावा अशी शक्यता वर्तवनण्यात येत आहे.ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास घडली.आलेवाडी नियत क्षेत्रामधे कक्ष क्र.357 खडकपाणी या ठिकाणी निमखेडी येथिल अशोक मोतिराम गवते वय 52 आणि माणा बंडू गवते वय 42 हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे गाभा क्षेत्रातील खडकपाणि सागमल्ली नियतक्षेत्रात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला.
त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.सदर घटनेची माहीती सकाळी 9 ते 9.30 वाजता श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना समिती निमखेडीचे अध्यक्ष नक्कलसिंग यांनी मोबाइल वरुन ए.आर.तोटे.वनरक्षक दक्षिण आलेवाडीबीट यांना दिली.अस्वलाचे हल्ल्यामधे निमखेडी येथिल दोन लोक गंभीर जखमी झाली आहेत.असे त्यांनी सांगितले.सदर ठिकाणी वनरक्षक ए.आर.तोटे.व अन्यकर्मचारी पोहचले असता दोघेही मृताव्यस्थेत दिसून आले.या दोघांच्याही मृतदेहापासून अंदाजे 15 ते 20 मिटर अंतरावर 6 ते 8 महिन्यांची अस्वलाची दोन पिल्ले मरण पावल्याचे दिसून आले.या पिलांच्या अंगावर कुर्हाडीने मारल्याच्या जखमा होत्या.या घटनेचा तपास सोनाळा पोलिस आणि उप वनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प टी.ब्युला एलील मती करीत आहेत.