अकोट (देवानंद खिरकर)-कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने आषाढी एकादशीला होणार्या पंढरपुरच्या सोहळ्याला विदर्भातील पालख्यांना नाकारण्यात आल्याने विदर्भातील वारकरी सांप्रदायाचे महाराज मंडळी तिव्र नाराज झाले आहे.त्यामुळे विदर्भातील पालख्या नाकारण्यात आल्याने विदर्भातील पालख्यांना काही मोजक्या भक्तांंना परवानगी द्या यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 जुन रोजी ह.भ.प.गणेश महाराज शेटे योगयोगेश्वर संस्थान अध्यक्ष वरुळ जऊळका यांनी उपोषणला बसण्याच्या इशारा दिला आहे.