अकोला,दि.९- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २५५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१२ अहवाल निगेटीव्ह तर ४३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ८६४ झाली आहे. तर आजअखेर २७९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ६६१९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६३३३, फेरतपासणीचे ११२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १७४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६५९४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५७३० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ८६४ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ४३ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ४३ पॉझिटीव्ह अहवाल आले. त्यात सकाळी प्राप्त ११ पॉझिटीव्ह अहवालात सहा महिला व पाच पुरुष आहेत. हे जुने शहर भागातील दोन तर उर्वरित प्रत्येकी माळीपुरा, खदान, सोनटक्के प्लॉट, श्रीहरीनगर सालासर मागे, गाडगेनगर, रेल्वेगेट न्यु तापडीया नगर, अकोट फैल, जवाहरनगर , बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
आज सायंकाळी प्राप्त ३२ पॉझिटीव्ह अहवालात १४ महिला व १८ पुरुष आहेत. त्यात पाच जण हैदरपुरा येथील,चार जण न्यू तापडिया नगर, चार जण खदान नाका, दोन जण खडकी येथील तर दोन जण आदर्श कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर उर्वरीत सिव्हिल लाईन, शिवाजी नगर, तार फ़ैल, खेडकर नगर, नायगाव, पोलीस क्वार्टर रामदास पेठ, खैर मोहम्मद प्लॉट, बाळापूर, वाशीम बायपास,कैलास टेकडी, सोलसो प्लॉट, अशोकनगर, फिरदौस कॉलनी, हांडे प्लॉट, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
एक जण मयत
दरम्यान आज उपचार घेताना एका ७४ वर्षीय इसमाचे निधन झाले. हा इसम गुलशन कॉलनी येथील रहिवासी असून तो दि.२६मे रोजी दाखल झाला होता,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
२७९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ८६४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ४० जण (एक आत्महत्या व ३९ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ५४५ आहे. तर सद्यस्थितीत २७९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.