अकोला,दि.9 – सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय मुकबधिर विद्यालय, अकोला येथे मुकबधिर विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 7 वी करीता फक्त मुलांना प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशा करीता अटी व शर्ती खालीलप्रमाणे.
विद्यार्थी कर्णबधिर असावा, जिल्हा शल्य चिकित्सकाचे अपंगत्वाचे 40 % वरील प्रमाणपत्र असावे, वयोगट 06 वर्ष ते 16 वर्षा पर्यंत, एकापेक्षा जास्त अपंगत्व नसावे, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
संस्थेत विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश दिल्या जाईल. विद्यार्थ्यांकरीता निवासाची, भोजनाची, अंथरून- पांघरून तसेच शालेय स्टेशनरी व इत्यादी शासन निर्णयाप्रमाणे विनामुल्य सोई सुविधा पुरविल्या जाईल. प्रवेश अर्ज शासकीय मुकबधिर विद्यालय, मलकापुर, अकोला येथे विनामुल्य उपलब्ध आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. 30 जुन 2020 पर्यंत राहील. अधिक माहिती करीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अकोला (अपंग शाखा) व शासकिय मुकबधिर विद्यालय, अकोला यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेशा संबंधी मो.क्र. वर संपर्क साधावा, असे अधिक्षक शासकीय मुक बधीर विद्यालय, अकोला यांनी कळविले आहे.
संस्थेचा पत्ता- शासकिय मुकबधिर विद्यालय, महसुला कॉलनी, सिध्देश्वर मंदिर समोर, मलकापूर, अकोला, ता.जि.अकोला. मो.नं. 8087167972, 9028395441, 9850779260, 8888694370 असा आहे.