तेल्हारा (विलास बेलाडकर)- सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा सलून व्यवसायिकांना आर्थिक सहाय्य शासनाने जाहीर करावे या मागणीसाठी दिनांक 9 जून रोजी तेल्हारा तहसील कार्यालयासमोर तेल्हारा शहर व तालुक्यातील सलून व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्यासह धोपटी घेऊन धरणे आंदोलन केले महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा तेल्हारा तालुक्याच्या वतीने यावेळी तेल्हारा तहसीलदार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने निवेदन तालुकाध्यक्ष गजानन कानेरकर व तालुका उपाध्यक्ष विलास बेलाडकर यांनी सादर केले सदरचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांचेमार्फत शासनास पाठविण्यात येणार असल्याचे तेल्हारा तहसीलदारांनी शिष्टमंडळात सांगितले धरणे आंदोलनात तेल्हारा शहरासह तालुक्यातील खापरखेड शेरी,वाडी आदमपूर घोडेगाव दहिगाव पाथर्डी येथील न्हावी समाज बांधव तालुका अध्यक्ष गजानन कानेरकर व तेल्हारा तालुका उपाध्यक्ष विलास बेलाडकर यांच्या नेतृत्वात सोशल डिस्टन्सी चे पालन करीत मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी गजानन कानेरकर विलास बेलाडकर नितीन शुद्ध मुके गजानन राजूसकर गोपी तुनवाल केशव पिंपळकर विजय राजूसकर अशोक पिंपळकर प्रकाश आंमोदकर गजानन मांझोडकर विनोद रुद्रकार करण तुनवाल गोपाल लिलडे, योगेश वरणकर सहभागी झाले होते आंदोलन स्थळी नगराध्यक्ष जयश्री ताई पुंडकर यांनी भेट देऊन रास्त मागणीचा अविलंब विचार करावा असा अभिप्राय व्यक्त केला नगरसेवक सुनील राठोड ,प्रमोद वाकोडे सरपंच गाडेगाव यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत