अमरावती: प्रशासनाकडून लॉकडाऊनचे टप्प्याटप्प्याने शिथीलीकरण करण्यात येत असून, आज पासून (9 जून) सकाळी 9 ते 5 या वेळेत घरपोच, तसेच काऊंटरवरूनही मद्यविक्रीला करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याबाबत घाऊक विक्रेत्यांनी 50 टक्के मनुष्यबळावर काम करावे. सर्व कामगारांची तपासणी करावी. मास्क, थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टन्स आदी दक्षतेचे पालन करावे. तसे न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या पी-1, पी-2 तत्वानुसार दुकाने सुरु राहतील. याबाबत उत्पादन शुल्क खात्याच्या निरीक्षकांनी दुकानांतून सर्व दक्षता सूचनांचे काटेकोर पालन होते किंवा कसे, याची सतत तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.