अकोला (प्रतिनिधी)- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा प्रशासन जिल्ह्यातील १५०० व विदर्भातील २५०० रोजदारी शेतमजुर व कामगार यांच्यावर मागील ३ महिन्या पासुन उपासमारीचि पाळी आणली आहे व कोणतेही प्रश्न प्रशासन सोडवित नाही म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठावर प्रशासक नेमुन करावी ही मागणी घेवुन निवेदन मेल द्वारे मा. ना. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु,
पालकमंत्री अकोला यांना पाठविण्यात आले व जिल्हाधिकारी व दंडाधिकारी साहेब अकोला यांची ५ तास वाट बघून सरते शेवटी दु. ३ दरम्यान भेट घेण्यात आली निवेदनावर बोलताना जिल्हाधिकारी साहेब म्हणाले की सदर बाबा महाराष्ट्र शासन अधिनिस्त आहे सदर आस्थापनेवर प्रशासक नेमवे या करिता प्रस्ताव पाठवतो असे आश्वासन कॉम्रेड नयन गायकवाड व राजेश वाघ यांनी दिले आहे निवेदनात संपुर्ण जगात कोरोना (कोवीड १९) आजारांने थयमान घातल्याने भारतात व राज्यात तसेच जिल्ह्यात मागील अनेक दिवसा पासुन लॉकडावुनच्या परीस्थीतीत शासनाने समस्थ खाजगी, निमसरकारी व सरकारी आस्थापनामधील कामगारांना कामावरुन बंद करण्यात येवु नये व बंद केलेल्या कामगगारांना वेतन देण्याचे ३१.०३.२०२० रोजी व कृषी संबंधीचे सर्व कामे सुरू राहतील असे शासन निर्णय काढुन आदेशीत केले असताना सुद्धा सरकारी शेतकरी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील अधिकारी यांनी हजारी हेक्टर शेतीवर शेतमजुरी व रोजंदारी वर काम करणारे मजुर करणारे अनेक कामगारांना बंद केले आहे लोकडवून काळातील वेतन थकीत आहेत. ज्या प्रक्षेत्रात काम सुरू आहे तिथे आरोग्याच्या दृष्टीने मास्क व हॉडग्लोज बाबत तक्रार करुन सुध्दा दि. १३.०४.२०२० रोजी दिलेले नाहीत या उलट विद्यापीठाची कृषी पत्रीका मार्च, एप्रील व मे २०२० मध्ये कोणती कामे करायची आहे असे स्पष्ट असताना काम असतांना सुध्दा कामावरुन बंद करणे जे कामगार कामावर आहे त्यांना कोणतेही आरोग्य सुवीधा न पुरूवीने या करिता डॉ. पं.दे.कृ.विद्यापीठ प्रशासनाला मेल द्वारे दि. २४.०४.२०२०, दि. ०४.०५.२०२०, दि. ०७.०५.२०२०, दि. ११.०५.२०२०, दि. १९,०५.२०२०, दि. २२.०५.२०२० तसेच दि. २७.०५.२०२० रोजी आणि वेळोवेळी सहाय्यक कामगार आयुक्त अकोला यांना सुध्दा तक्रारी सुचना द्वारे माहिती दिल्यावर तसेच सर्व पक्षीय बैठकीत सुध्दा मुद्दा मांडल्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही उलट मिळालेल्या माहिती नुसार अधीकारी वर्गच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत नसल्याने मा. कुलसचिव यांचे सचीव यांचे सोबत चर्चा केल्यावरही भेट व कार्यवाही होत नसल्याने हजारो एक्कर जमीन पडीत ठेवण्यात येणार आहे व त्यामुळे जिल्हाती १५०० जवळपास व विदर्भातील २५०० रोजदारी शेमजुर, कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे व येणार असल्याने संघटनेच्या वतीने केलेल्या निवेदनावर मागिल ३ महिण्या पासुन प्रशासनाने कोणतेही कार्यवाही न केल्याने शेतमजुर कामगारांत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासन करते आहे काय असा प्रश्न पडल्याने आपण सदर आस्थापनावर त्वरीत प्रशासक नेमावे व योग्य कादेशिर कार्यवाही करावी व १. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलावर प्रशासक यांची नेमनुक करण्या बाबत व बैठक घेण्या बाबत आदेश द्यावे.
२. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संपुर्ण जमीन वहितीखाली आणावी व मागिल हंगामात मागिल वर्षी पडीत ठेवलेल्या जमीनीची योग्य चौकशी करुन कार्यवाही करावी.
३. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अधिपत्याखाली असलेले अमरावती व अकोला येथील सर्व शेतमजुर व रोजदारी मजुर यांना फेब्रुवारी, मार्च, एप्रील, मे २०२० चे लॉकडावुन काळातील वेतन त्वरीत अदा करावे.
४. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अधिपत्याखाली असलेले अमरावती व अकोला येथील शेतमजुर व रोजदारी मजुर यांना लॉकडावुन नंतर कामावरुन बंद, किंवा कोरोना संचारबंदीत कामावर उपस्थित राहु शकले नाही म्हणुन सदर दिवसाचे वेतन त्वरीत अदा करण्या बाबत परीपत्रक काढण्यात यावे.
५. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अधिपत्याखाली असलेले अकोला येथील कामावर असलेले मजुर व रोजदारी मजुर यांना मास्क व हात मोजे (हॉन्ड ग्लोज) साबुन देण्यात यावे व डॉ. पं.दे.कृ.विद्यापीठ रोजंदारी शेतमजुर कामगार यांच्यावरची उपास मारी थांबवावी असे म्हटले आहे उद्या पालकमंत्री मा. बच्चुभाऊ कडु अकोल्यात आहे त्याची व आमदार मा. गोपिकिसन बाजोरीया, आमदार मा. अमोल मिटकरी यांना सुद्धा प्रशासक नेमून रोजंदारी शेतमजुर कामगार यांच्यावर आलेली उपासमारी दुर करावी या करीता निवेदन देणार आहे अन्यथा जेलभरो, घरीच उपोषण इत्या आंदोलन नाइलाजासत्व करावे लागेल असे कॉ. मदन जगताप, कॉ. सुहास अग्निहोत्री, कॉ. विद्याधर ढोरे, कॉ. कुरुमदास गायकवाड कॉ. रमेश गुहे, कॉ. संतोष मोरे यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे..!