अमरावती, दि. 5 : जिल्ह्यात नागरिकांसाठी पेट्रोल व डिझेल पंप नियमित सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली असून, तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.
यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोल व डिझेल पंप नागरिकांसाठी सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत सुरू होते. त्याचप्रमाणे, केवळ अत्यावश्यक सेवा वाहतूकदारांना व शासकीय सेवा वाहतुकीसाठी पंप खुले होते. तथापि, आता टप्प्याटप्याने लॉकडाऊन उघडण्यात येत आहे. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व पेट्रोल व डिझेल पंप हे त्यांच्या वेळेत नियमितपणे सुरू राहतील. हे आदेश दि. 30 जूनपर्यंत लागू राहतील.