अमरावती, दि. 5 : पर्सिस्टंट फाऊंडेशनतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयाला एक हजार पीपीई कीट व 10 लीटर सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला.
फाऊंडेशनच्या अनया नेतानराव यांनी हे साहित्य आज डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे सुपुर्द केले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हुमणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत महल्ले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, डॉ. विलास जाधव, मुख्य औषध निर्माता योगेश वाडेकर, संदीप मुळे, रेखा नेतानराव, प्रज्ञा नेतानराव, सुनील मानकर आदी उपस्थित होते.
पर्सिस्टंट टेक्नॉलॉजी या कंपनीने सामाजिक बांधीलकीच्या हेतूने फाऊंडेशनची स्थापना केली असल्याचे श्रीमती नेतानराव यांनी सांगितले. कोरोना संकटकाळात जोखीम स्वीकारून काम करणा-या डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी या पीपीई कीट उपयुक्त आहेत. या अमूल्य भेटीबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी संस्थेचे आभार मानले.