अकोला (प्रतिनिधी)- खदान पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आझाद कॉलनीच्या बाजूला असलेल्या बळवंत कॉलनी येथे भगत दांपत्याचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले .ही घटना शुक्रवारी (ता.5) सकाळी उघडकीस आली. ही माहिती खदान पोलिसांना मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. ही घटना कशामुळे घडली आणि यामागे काय कारण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतक सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी
अकोला शहरातील बळवंत कॉलनी परिसरात आज पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतक भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असून मृत्युचे कारण नेमकं कळू शकले नाही. अधिक तपास खदान पोलिस करतायत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह आढळलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भगत यांच्या बंगल्यात त्यांच्या पत्नीसह दुसरे कोणीही कुटुंबीय राहत नव्हते . घरात आग लागून जीव गुदल्यामुळे मृत्यू झाला झाला की ही आत्महत्या आहे हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.