हिवरखेड (धीरज बजाज)- भटकलेला काळवीटाला कुत्र्यांनी जखमी केल्यानंतर हिवरखेड वासियांनी जखमी काळविटाला जीवनदान दिल्याची घटना दि 03 जून बुधवार रोजी घडली.
निसर्ग चक्रीवादळाच्या परिणामाने अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रुपराव येथेही जोरदार वृष्टी झाली. मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे एक काळवीट समूहातून भटकला आणि हिवरखेड गावातील स्वस्तिक कॉलनी भागात शिरला. आपल्या गावात नवीन प्राणी पाहिल्यानंतर कुत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत काळवीटा वर आक्रमण केले. कुत्र्यांच्या हमल्यात काळवीट जखमी होत असतानाचे पाहून हिवरखेड वासीयांनी धाव घेतली आणि काळवीटाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. काळवीटाला अत्यंत रक्तस्त्राव होत असल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ सूरज चौबे, धिरज बजाज, मनीष भुडके, राहुल गिर्हे यांच्यामार्फत वनविभागाचे अधिकारी अजय बावणे, प्रवीण पाटील, कैलास चौधरी, सुरजूसे यांच्यासह वरिष्ठ वनधिकाऱ्यांना दिली. तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी राजू वायकर यांच्यामार्फत प्रथमोपचार करण्यात आले.
वन अधिकार्यांना सुपूर्द करेपर्यंत सदर काळविटाला संरक्षण देत त्याची पूर्ण देखभाल करून हिवरखेड वासीयांनी सदर काळविटाला जीवनदान दिले. नंतर वनअधिकारी कैलास चौधरी यांनी घटनास्थळी येऊन चौकशी करून संपूर्ण माहिती घेतली आणि काळवीटाला ताब्यात घेतले. नंतर या जखमी काळविटाला शकीलोद्दीन शरीफोद्दीन यांच्या वाहनातून वन्यजीव विभागाच्या आकोट येथील कार्यालयात सुखरूप रवाना करण्यात आले. यासाठी आरोग्य कर्मचारी वायकर, राहुल गोकटे, सोहेल खान, शकील भाई, दशरथ गावंडे, छोटू काइंगे, गोपाल काळपांडे, गणेश कोल्हे, सुदाम भगत, नितीन भुडके, किरण भोपळे, यांच्यासह अनेक नागरिकांनी सहकार्य केले.