तेल्हारा (योगेश नायकवाडे)- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वीज बिल संशोधन 20 व ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या चे खाजगीकरण करण्याचे धोरण विरोधात तेल्हारा येथे वीज क्षेत्रातील नामांकित संघटना च्या कृती समिती च्या वतीने काळ्या फिती लावून आपला जाहीर विरोध दर्शविला, संयुक्त कृती समितीचे आवहन नुसार केंद्र सरकार च्या प्रस्तावित या कायद्या मुळे देशभरातील शेतकरी, औद्योगिक ग्राहक,व सर्वसामान्य गरीब जनतेला संकटाचा सामना करावा लागणार असून हा कायदा लागू करण्यात येऊ नये म्हणून संपूर्ण भारतात दि 1 जून रोजी वीज कर्मचारी यांनी कामावर काळ्या फिती लावून या अन्यायकारक कायद्याच्या विरोध मध्ये आपला असंतोष दाखविला आहे, यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे तेल्हारा शाखा अध्यक्ष कॉ अमित सातळेकर,सचिव कॉ अफसर शाह, कॉ गणेश उज्जैनकर,कॉ पवन चोपडे, कॉ अरविंद मोरोकर, कॉ प्रशांत घाटोळ,एस इ ए चे सहाय्यक अभियंता आकाश गुप्ता, अखिल कुमार, कु कल्याणी गावंडे, तांत्रिक युनियन चे अजय कुमार कराळे सहित उपविभागीय कार्यालय चे श्री गोठ खडे साहेब, अमित पांडे सहित कर्मचारी उपस्थित होते.