तेल्हारा(प्रतिनिधी)- शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर न राहता अकोला जिल्ह्यात वाढता असलेला कोरोनाचा आलेख पाहता गावात कोरोनाचा प्रभाव वाढु नये यासाठी तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथील विस ते पंचविस वर्षीय युवकानी हातातून फलक घेऊन गावात कोरोनाची जनजागृती केली आहे जय हनुमान युवा मंडळ व नेहरू युवा मंडळाचे युवक यामध्ये सहभागी झाले होते
कोरोना विषाणू ची माहिती सांगताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा गेल्यास मास्क लावा सानिटायझचा वापर करा सोशल डिस्टन्सिग ठेवा सदी ताप खोकला अशी काही लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी अशी जनजागृती या दोन्ही मंडळाच्या सदस्यांनी केली असुन त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यामध्ये राहुल काळे धनंजय वाघ कृष्णा काळे हरिओम काळे अजय सोळंके आदी युवकांनी सहभाग घेतला होता जे काम जिल्हा परिषद पंचायत समिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे ते काम या युवकांनी करुन एक आदर्श निर्माण केल्याचे बोलले जात आहे हाच आदर्श इतर गावांतील युवकांनी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे