तेल्हारा(प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात सर्व स्थरातून उपाययोजना होणे गरजेचे असून १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करावी,कृषी कर्ज प्रकिया जलदगतीने राबवावी असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले तेल्हारा येथे घेतलेल्या कोरोना व खरिपपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
शेतकऱ्यांना थेट बांधावर कृषी निविष्ठा मिळाव्यात,कृषी कर्जबाबत शेतकऱ्यांना त्रास न होता कर्जप्रक्रिया राबवावी,मान्सूनपूर्व कृषिविज विषयक कामे लवकर करण्यात यावीत,सीसीआय खरेदी प्रक्रिया नाफेड खरेदी जलदगतीने करावी याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी कृषी,आरोग्य, पुरवठा, पाणीटंचाई,पोलीस विभागाबाबत आढावा घेतला यावेळी राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,माजी सभापती पुंडलीकराव अरबट उपस्थित होते.यावेळी तहसीलदार
तेल्हारा सुरडकर,पोलीस स्टेशन ठाणेदार विकास देवरे,हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष लवंगडे, न प मुख्याधिकारी अकोटकर,कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित होते.