बाळापूर(प्रतिनिधी)- मोरगांव सादीजन येथील किसन उकर्डा किनेकर, वय ४२ यांचा दिनांक २७ में रोजी उष्मा घाताने मृत्यु झाला, त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले आहेत ते भूमिहीन शेत मजूर आहेत बाळापूर मतदार संघाचे कर्त्तव्यदक्ष आमदार श्री नितीन बाप्पू देशमुख यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्या कुटुंबाला आपल्या स्व ख़र्चातुन १० हजार रूपयाची आर्थिक मदत केली तसेच शासनस्तरावर मदत मिळवून देण्याची खात्री दिली.