तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोना काळात माणुसकी हरवली असून रोज आपण काहीना काही याबाबत ऐकत असतो आज शहरातील एका ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याने खांदा द्यायला कोणी तयार नसल्याने अखेर नातेवाईकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.
आजच्या घडीला कोरोनाच्या महामारीने एक धास्ती प्रत्येकाच्या मनात बसली आहे स्वतःचा सगेसोयरे सुद्धा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नाहीत हे आपण रोज घडणाऱ्या घटनांमधून बघतो असाच काहीसा प्रकार तेल्हारा शहरात घडला असून शहरातील आठवडी बाजारात राहणारे गजानन भटकर या ५५ वर्षीय इसमाचा आज सायंकाळी मृत्यू झाला घरी पत्नी व लहान मुले त्यात लॉकडाऊन मुळे नातेवाईक येऊ शकले नाहीत घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची त्यामुळे अंत्यसंस्कार करणे सुद्धा कठीण त्यात मृतदेहाला खांदा द्यायला कोणी नसल्याने मोठा प्रश्न मृतकाच्या पत्नी समोर उभा राहला होता.अशातच मृतकांचा नातेवाईक पत्नीचा भाऊ शहरातच राहतो कोणी खांदा द्यायला तयार नसल्याने त्यांनी हातगाडी घेऊन त्याच्यावर मृतदेह ठेऊन स्मशानभूमी गाठली व मृतकावर अंत्यसंस्कार केले.याघटनेने मात्र माणुसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
यावेळी तेल्हारा शहरात काही महिन्यांपूर्वी सामाजिक पुढाकारातून शवगाडी तयार करण्यात आली आज शहरातील काही जणांनी गाडी उपलब्ध करण्याचा पर्यन्त केला मात्र ती सद्या परिस्थितीत बंद असल्याने त्यांना हातगाडीवरून मृतदेह नेण्याची वेळ आल्याचे समजले.
शहरातील युवक मनीष गवळी ने दिला माणुसकीचा परिचय
शहरातील शिवाजी चौक येथे राहणारा युवक मनीष गवळी याने स्वतःहून पुढाकार घेऊन मृतकाच्या घरच्या परिस्थिती बद्दल माहिती घेतली असता परिस्थिती हलाकीची असल्याचे समजले यावेळी त्याने मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारा खर्च देऊन आपली माणुसकी दाखवली.