अकोट (शिवा मगर)- ‘माझ्याकडे का बघतो’ या शुल्लक कारणावरुन अकोट शहरातील एकाची चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना २८ मे रोजी रात्री घडली. मुदासिर अली मुख्तार अली असे मृतकाचे नाव असुन, पोलिसांनी आरोपीला अटक करुन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे .या घटनेने अकोटात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहीती नुसार रमजान महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृतक मुदासिर अली मुख्तार अली याचा लहान भाऊ व आरोपी यांच्यात भांडण झाले होते.त्यानंतर २८ मे रोजी रात्री धारूळीवेस या ठीकाणी पुन्हा दोघामधे भांडण झाले ‘तु माझ्याकडे का बघतो’असे म्हणत आरोपीने आपल्या हातातील चाकूने मुदासिर अली याच्या छातीच्या डाव्या बाजुला सपासप वार केले.या हल्यात गंभीर जखमी झाल्याने मुदासिर अली याला अकोट ग्रामीण रुग्णालयात अकोट येथे नेले.तेथून त्याला अकोला येथिल सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेची फिर्याद अकोट शहर पोलिस स्टेशनला मोबिन अली जामीन अली यांनी दाखल केली.पोलिसांनी आरोपीविरुद्ध अकोट यांच्या विरुध्द भांदवि 302 कलमन्वये गुन्हा दाखल केल्याची माहीती दिली.आरोपीला रात्रीच अटक करण्यात आली आहे.पुढिल तपास शहर पोलिस निरिक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.