तेल्हारा(प्रतिनिधी)- विदर्भात अकोला हे सर्वाधिक रुग्ण असलेला जिल्हा बनला असून तेल्हारा शहरात सुद्धा रुग्ण आढळले होते.त्यामुळे आज सायंकाळी ग्रामीण रुग्णालयाकडून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची खबरदारी म्हणून आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आपली आरोग्याची तपासणी केली.यावेळी प्रतिबंधित क्षेत्रातील शेकडो नागरिकांची नागरिकांच्या सहकार्याने तपासणी करण्यात आली.यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी अशोक तापडिया व डॉ राहुल सदाफळे यांनी नागरिकांची तपासणी केली.