मुंबई – दि. २६ – अनुसूचित जाती जमाती च्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व पीएचडी करीता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीच्या आवेदन प्रक्रियेची उद्याची शेवटच्या तारिख आहे, तथापि कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने विद्यार्थी जात पडताळणी व उत्पन्नाचा दाखला व पुर्वअटींचे ऑफर लेटर ह्यांची पूर्तता करू शकत नसल्याने ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केंद्रीय सचिव योगेश धिंग्रा ह्यांचे कडे केली आहे.
अनुसूचित जाती जमाती च्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व पीएचडी करीता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीची उद्या दि. २७ मे २०२० ही शेवटची तारिख आहे, तथापि कोरोनामुळे सर्व जिल्ह्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. सेतू केंद्र/ महा ई सेवा केंद्र बंद आहेत. जात पडताळणी कार्यालये देखील बंद आहेत.किंवा त्यामध्ये कामकाज प्रभावित झाले आहे.त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याची विद्यार्थी जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रे ह्यांची पूर्तता करणे हे अल्प मुदतीत शक्य नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी हवालदिल असून कोरोनामुळे उद्याच्या २७ मे पर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक होतकरू व गरजू विद्यार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
भारतात जे विद्यार्थी पदव्युत्तर किंवा डॉक्टरेट शिक्षण घेत आहेत किंवा घेणार आहेत.त्यांना पुन्हा शिष्यवृत्ती साठी फॉर्म भरण्यास मनाई केली जात आहे व हि अट म्हणजे विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक उच्च शिक्षणा पासन दूर ठेवणे होय, हा धडधडीत अन्याय आहे. ही अट त्वरीत काढण्यात यावी अशी वंचित बहुजन आघाडी ची मागणी आहे. ह्या आधी देखील सहा लाखाची उत्पन्न मर्यादा घालण्याचा घाट घालण्यात आला होता.परंतु मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने राज्य सरकारने ती तूर्त स्थगित केली असली तरी नव्याने वेगवेगळ्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.
अनेकदा परदेशी विदयापीठे ही कुठल्याही अटी शिवाय ऑफर लेटर देत असत. परंतु आता सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यास वाजवण्यात आले आहे, हा देखील मोठा खोडा आहे. सबब ही अट रद्द करून विद्यार्थ्यांना कुठल्याही अटी शिवाय पुर्वअटींचे ऑफर लेटर स्वीकारून त्यांना सुधा या शिष्यृत्तीसाठी पात्र ठरवण्यात यावं, ही मागणी देखील वंचित बहुजन आघाडीने केली आहे. देश विदेशातील कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व कुलूपबंद असल्याने परीक्षा व प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. अथवा त्यात सवलती देऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने देखील ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. सोबतच संबंधित शेकडो विद्यार्थ्यांनी देखील ई मेल आणि व्यक्तिगत पद्धतीने सामाजिक न्याय मंत्री, त्यांचे स्वीय सहाय्य्क ह्यांना दूरध्वनी वरून संपर्क करून ही मुदतवाढ देण्याची व अटी शिथिल करण्याची मागणी देखील केली आहे.
अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे ह्यांनी दिली आहे.