अकोला,दि.२६- आज सकाळपासून जिल्ह्यात लॉकडाऊन कशाप्रकारे खुला राहणार? कोणती दुकाने खुली राहणार इ. संदर्भात माहिती देणारा मेसेज व्हायरल झाला होता. हा मेसेज फेक म्हणजेच असत्य असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून या संदर्भात सायबर सेल कडे तक्रार करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, हा मेसेज चुकीचा आहे.
हा मेसेज अकोला जिल्हा प्रशासनाचा नसून यामध्ये कुठेही अकोला जिल्ह्याचा उल्लेख नमूद नाही, यावर कोणीही विश्वास ठेवू नये. अकोला जिल्ह्यात दिनांक 21/5/2020 चे आदेश आहेत. अकोला महानगरपालिका क्षेत्र रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे अकोला शहरात अत्यावश्यक सेवा व कृषी विषयक आस्थापना सुरु असून अन्य सर्व आस्थापना बंद आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अफवा पसरवण्यासाठी हा मेसेज व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने सायबर सेल कडे तक्रार केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा: अकोला पातुर रोडवरील सम्यक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला आग,लाखोंचे नुकसान