पातुर(सुनील गाडगे)- अकोला पातुर रोडवरील चिखलगाव येथील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी ला आज सकाळी आग लागल्याने लाखोंचे नुकसान होऊन अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
आज सकाळी वंचीत बहुजन आघाडीचे नेते यांच्या संस्थेचा सम्यक जिनिग प्रेसिंग फॅक्टरी ला भीषण आग लागली यावेळी तिथे अनेक मजदूर काम करीत होते मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही.यावेळी हजारो क्विंटल कापूस, कापसाच्या गठानी,कापसाची सरकी जळून खाक झाली.यावेळी पातुर व अकोला येथील अग्निशमन दलाने आग विझवली.यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.