तेल्हारा (तालुका प्रतिनिधी): शहरात चार व बेलखेड येथे एक असे पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली होती परंतु घरातील इतर तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा दायक जरी वृत्त असले तरी संपर्कात आलेल्यांची रिपोर्ट ची प्रतिक्षा तेल्हारा वासीयांना लागली आहे
शहरात व बेलखेड येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच रुग्ण राहत असलेला परीसर सील करण्यात आला व रुग्णांच्या संपर्कात आलेल्याना कोव्हिडं केअर सेन्टर विपश्यना केंद्र खापरखेड येथे दाखल करण्यात आले तेल्हारा शहर व बेलखेड आता रेड झोन झाल्याने रेड झोनमधून दाखल झालेल्याना गोखे महाविद्यालय चे वसतिगृह व बेलखेड येथील जिप शाळेत कॉर्नताईन करण्यात आले तसेच शहरात वास्तव्यास असलेल्या रुग्ण च्या परिसरात सर्वे करण्यात आला असता शहरातील भीम नगर व आजूबाजू च्या परिसरातील 650 नागरिकांची तपासणी करण्यात आली व बेलखेड येथील 381 घरातिला कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात आली शहरातील व बेलखेड येथिल प्रत्येकी एकाच कुटुंबातील चार सदस्य यांचे स्वब तपासणी करीता पाठविण्यात आले होते पैकी शहरातील चारही सदस्य पॉझिटिव्ह निघाले असता बेलखेड येथील एक चार वर्षीय मुलगा पोसिटीव्ह निघून तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात जनतेला दिलासा मिळाला असला तरी रुग्णांच्या संपर्कात आल्याची संख्या बेलखेड व शहर अशी एकूण 25 कोव्हिडं केअर सेंटर ला भरती असून 27 मे मंगळवारी या नागरिकांचे स्वब घेऊन अकोला येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ तापडिया यांनी दिली यामध्ये बेलखेड येथील 9 व तेल्हारा शहरातील 16 जणांचा समावेश आहे
बेलखेड येथे कॉरंट टाईन केलेले पळाले
रेड झोन मधून आलेल्या नागरिकांना आता होम कॉरंट टाईन न करता ग्रामीण भागात त्या गावातील जिप शाळेत कॉरंट टाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असता सुविधाचा अभाव असल्याचे कारण सांगून काही नागरिक यांनी सेन्टर मधून पोबारा केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली असती प्रशासनाने त्यांना परत येण्याचे आव्हान केले परंतु ते परत येत नसल्याने व याआधी आलेल्या ना होम कॉर्नताईन केल्याने काहीसा वाद निर्माण झाल्याचे ही वृत्त आहे परंतु तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांनी जे पळून गेले ते परत येत नसतील तर गटविकास अधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेस दिल्याने गुन्हा ची धडकी भरता च ते नागरिक परत आल्याची माहिती बीडीओ भरत चव्हाण यांनी दिली.
सिव्हिल सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनि कोव्हिडं सेन्टर ला भेट दिली असता त्यांनी पाहणी करून मुबई पुणे या सारख्या रेड झोन मधून आलेल्याना कॉर्नताईन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या
शहरात रस्ते अडणुकीला उधाण
शहरात चार जण पॉझिटिव्ह निघाल्याने मुख्य रस्ता च रेड झोन मध्ये आल्याने प्रशासनाने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली असता अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून आप आपल्या परिसरातील रस्ते बांबू ,लाकूड वाहने आडवे लावून बंद केले त्यामुळे अत्यावश्यक व जीवनाशयक वाहतुकीला बाधा पोहचत असल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असता परवानगी शिवाय रस्ता बंद करता येत नाही तरी असे आदमुठे धोरन जनतेने अवलंबू नये रस्ता बंद करणे हा म्हणजे कोव्हिडं वर मात करणे नव्हे किंवा त्यावर हा पर्याय नाही शहरातील अनेक वसाहती ह्या रोड वर च वास्तव्यास आहेत मग त्यांनी काय करायचे तर स्वतः आपणच विनाकारण घराबाहेर न पडल्यास व स्वतः ची शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शनाची अंमलबजावणी केल्यास खऱ्या अर्थाने कोरोना व र मात करता येऊ शकते अनेकांनी रस्ते बंद करून घरासमोरील रस्ते पटांगण केले असता ठाणेदार विकास देवरे यांनी कोणीही विनापरवाना रस्ता बंद करू नये केल्यास कार्यवाही करण्यात येईल असे जाहीर केले तर काही ठिकाण चे रस्ते सुरू केले